12 तासात धोंडगव्हाणवाडीतील खुनाचा उलगडा; वडनेरभैरव पोलिसांची कामगिरी


 चांदवड प्रतिनिधी : हेमंत जाधव

वडनेरभैरव (ता. चांदवड) जवळील धोंडगव्हाणवाडी येथील ४० वर्षीय तरुणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासात या खुनातील दोघा संशयित यांना अटक करत खुनाचा उलगडा केला. वडनेरभैरव पोलिसांनी ही कामगिरी केली.

     संशयित यांना न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. जुन्या वादातून हा खून करण्यात आल्याची कबुली संशयित यांनी दिली. 

हिरामण यशवंत जाधव (रा. हातरूंडी, ता. सुरगाणा ) या व्यक्तीचा मृतदेह धोंडगव्हाणवाडी ( वडनेर भैरव, ता. चांदवड) येथे आढळून आला होता. मयताची पत्नी मीनाबाई यांनी तिचा पती हिरामण याचा अपघात नसून घातपात केला असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती.

      वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे, सहायक पोलिस निरीक्षक श्री. दोडे व पोलिस कर्मचारी यांनी सदर गुन्ह्यातील मयताचे नातेवाईक याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता जालिंदर राजू जाधव (वय १९, रा. पायरपाडा, ता. सुरगाणा) आणि देविदास सुभाष पवार (वय ४० रा. आमदा, सुरगाणा) यांच्यासोबत चार एप्रिलला रात्री चमकवाडी (ता. सुरगाणा) येथे गेला होता. त्यानंतर तो परतला नव्हता. या माहितीवरून पोलिसांनी जाधव व पवार यांना ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता मयत हिरामण हा संशयित यांना शिवीगाळ करीत असल्याने व जुन्या वादातून हिरामण जाधव यांच्या डोक्यात दगड मारून त्यास जीवे ठार मारले व त्यास बांबूवर झोपवून शेतातील विहिरीजवळ फेकल्याचे संशयितांनी कबूल केले.

      अवघ्या बारा तासात पोलिसांनी या खुनातील संशयित यांना अटक करत खुनाचा उलगडा केला.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...