चांदवड ला महाविकास आघाडीकडून कांदा अनुदानासाठी खरीप पीक पेरा अट रद्द करावी प्रांताधिकारी यांना निवेदन*


 चांदवड प्रतिनिधी- ( हेमंत जाधव )


 चांदवड- कांदा अनुदानासाठी सातबारा वरील खरीप कांदा लागवड पिक पेरा ची अट शिथिल करणे बाबत आज चांदवड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने माननीय प्रांत अधिकारी देशमुख साहेब चांदवड यांना निवेदन देण्यात आले.


महाराष्ट्र शासनाने 01 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत कांदा अनुदान देण्याचे ठरवले परंतु काही शेतकऱ्यांचे पीक पेरे हे ७/१२ वरती खरीप कांदा लागवड लावलेले नाही.

     मात्र त्यांनी कांदा पिकवलेला आहे त्यांनी कांदा विक्री केलेला आहे. अशा शेतकऱ्यांना सातबारा कागदपत्र अनुदानासाठी जोडत असताना त्यावरती मार्केट कमिटी कडून सातबारा ची नोंद असावी असा सातबारा द्यावा त्याबाबत सरकारने कांदा खरीप पिक नोंद शिथिल करून मार्केट कमिटी मध्ये कांदा विक्री केलेल्या पावतीवरून शेतकऱ्यांना कांदा अनुदान त्यांच्या खात्यावर ती वर्ग करावी शेतकरी बांधवांना कांदा अनुदान देण्यापासून कोणालाही वंचित ठेवू नये. अशी मागणी आज चांदवड तालुका महाविकास आघाडी यांच्याकडून करण्यात आली.

    मागणी मंजुर न झाल्यास महाविकासाकडे च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन प्रांताधिकारी चांदवड यांना निवेदन देताना श्री शिरिषकुमार वसंतराव कोतवाल, श्री संजय दगुजी जाधव, श्री नितीन रघुनाथ आहेर, डॉ सयाजीराव नारायण गायकवाड, श्री प्रकाश वसंतराव शेळके, श्री शिवाजी बाबुराव कासव, श्री नितीन निरुत्ती गुंजाळ आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...