⚡ ब्रेकिंग News

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूपाभवानी मंदिर परिसराची महापौरांकडून पाहणी; गर्दी, स्वच्छता, पाणी आणि दर्शन व्यवस्थेचा घेतला आढावा!

सोलापूर प्रतिनिधी: प्रवीण कासार 

नवरात्रोत्सवासाठी रूपाभवानी मंदिर परिसराची महापौरांकडून पाहणी
सोलापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी भाविकांसाठी आवश्यक नागरी सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या. 
नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने दर्शनरांग, भाविकांच्या ये-जा करण्याचे मार्ग आणि गर्दी नियंत्रण याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. भाविकांना मंदिरात सुलभ प्रवेश मिळावा आणि दर्शनानंतर सुरक्षितपणे बाहेर पडता यावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच परिसरातील स्वच्छता, कचरा संकलन, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि प्रकाश व्यवस्था यांचाही आढावा घेण्यात आला. उत्सव काळात संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. 
महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, नवरात्रोत्सव हा नागरिक आणि देवीच्या भाविकांसाठी श्रद्धेचा महत्त्वाचा उत्सव असून, भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि निर्विघ्न दर्शन मिळावे, याला प्रशासनाचे प्राधान्य राहील.
पाहणीदरम्यान उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक, मंदिराचे पुजारी आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...