सुरगाणा तालुक्यातील साळभोये या गावात नुकताच स्वादिष्ट फाउंडेशन(PRA) च्या वतीने सर्वांगी गाव विकास योजनेअंतर्गत गावातील व तालुक्यातील राजकीय,व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
यावेळी सुरगाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष. राजू पवार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मा.कॉ. जे. पी. गावित , सरपंच सौ. अनिता गवळी, सरपंच. सदुभाऊ बागुल, पोलीस पाटील. चिंतामण भोये, ह भ. प. जयंत महाराज सालभोये ग्रामसेवक.न्हायदे, स्वदेश फाऊंडेशनचे तालुका व्यवस्थापक. राजेंद्र गुंड सर, दीपक मोरे सर, निलेश जावळे सर, अहिरे सर, उपस्थित होते.
येथील आश्रम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रदीप बागुल सर यांनी नव्याने बांधकाम झालेले मुलींचे होस्टेल खुल करकरून त्याच ठिकाणी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली.
या वेळी ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या वतीने बागुल सरांचं सर्वांगीक कौतुक करण्यात आले.
सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वदेशी फौंडेशनच्या पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वत्र एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळेस तालुका अध्यक्ष. राजू पवार, यांच्या हस्ते गावातील कमानीचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर गावात फेरी काढून "स्वच्छ गाव – सुंदर गाव" या संकल्पनेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गावातील महिलांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून आपल्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविले.
स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातुन सालभोये गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्टकाम करणाऱ्या असे निवडक व्यक्तींना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
नव्या विकास प्रवासाला सुरुवात करत असून, गावाचा सर्वांगीण कायापालट होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठी राजेंद्र भोये, व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
Post a Comment