पवन नगर भाजी मार्केट मध्ये भाजी विक्रेत्या महिलेवर हल्ला


 सविस्तर वृत्त असे की आज दिनांक ०७/०१/२०२३ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास, पवन नगर भाजी मंडई येथे, भाजी विक्रेता महिला, तिच्या सांगण्यावरून  नाव - मनीषा राजपूत वय (४०) ही आपला भाजी विक्रीचा व्यवसाय करत असताना.हिच्यावर दोन महिला, १) शितल शिरसाट  २) पूजा शिरसाट, यांनी अचानक मागून येऊन हल्ला केला. या हल्ल्यात मनीषा राजपूत हिच्या  डोक्यात, पोटात पाठीत, बरगडीत,असा खूप मार लागलेला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना. या भाजी मंडईत शेकडो लोक भाजी खरेदीसाठी आलेले होते.या सर्वांसमोर हा प्रकार घडला. परंतु या महिलेस वाचवण्यासाठी कोणीही आले नाही.  पवननगर भाजी मंडई आणि पवन नगर पोलीस चौकी याच्यात फक्त दहा मीटर अंतर आहे. हा प्रकार दूर दूरपर्यंत  लोकांना कळाला परंतु दहा मीटर अंतरावर असणाऱ्या पोलिसांना मात्र हा प्रकार कळाला नाही हे विशेष, या  महिलेने ११२ नंबरवर पोलीस मदतीसाठी संपर्क केला. मात्र पत्रकार पोहोचले. पण पोलीस पोहोचले नव्हते. बराच वेळानंतर पोलीस आले. त्यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे त्या महिलेस तक्रार दाखल करण्यासाठी घेऊन गेले. अंबड पोलिसांनी त्यांना जिल्हाशासकीय रुग्णालयामध्ये जाऊन इलाज करा  असे सांगून, शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. शासकीय रुग्णालयातून त्या महिलेस किरकोळ गोळ्या औषधे देऊन पुन्हा अंबड पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आले. ही एकटी महिला रात्री नऊ वाजेच्या पुन्हा तक्रार दाखल करण्यासाठी अंबड पोलीस स्टेशन येथे आली.परंतु तुमच्या मागील भांडणाच्या कारणातून हे भांड झालेले आहे. तुमची तक्रार पोलीस हवालदार पवन परदेशी यांच्याकडे आहे तुम्ही त्यांच्याकडे जा असे सांगण्यात आले.  पोलीस हवालदार पवन परदेशी यांच्याकडे ही महिला गेली असता. तक्रार बी दाखल करत नाही तुम्ही अंमलदारांकडे तक्रार दाखल करा. असे सांगून या महिलेस टोलवाटोले ची उत्तरे दिले जात आहेत. एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी या महिलेची परिस्थिती झालेली आहे. जर घरी जाऊ, आणि पुन्हा त्यांनी येऊन जर मला घरात घुसून मारहाण केली तर काय होईल, त्यातल्या त्यात ही महिला एकटीच राहते. आई वडील किंवा परिवार नसल्यामुळे, या महिलेवर मात्र आता, अतिशय बिकट प्रसंग ओढवलेला आहे. जीवाच्या भीतीने आता ही महिला आसरा शोधत आहे. एकीकडे हल्लेखोरांपासून जीवाची भीती, तर दुसरीकडे पोलिसांची मदत नाही. उद्या या महिलेचा काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण ? एकीकडे प्रशासन निर्भया पथक, स्थापन करून मोठमोठ्या गप्पा करते. तर दुसरीकडे रात्री, अपरात्री अंबड पोलीस स्टेशनला मदत मागण्यासाठी आलेल्या महिलेस संरक्षण तर सोडा मदतही मिळत नाही. या प्रकरणामागील गौड बंगाल काय आहे हे आता अंबड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोधून काढले पाहिजे. आर्थिक व्यवहारांसाठी अंबड पोलीस स्टेशन  पहिले खूप बदनाम झालेले आहे. यातून काही नवीन प्रकार समोर येतो की काय? हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...