अंबड पोलीस स्टेशन गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी


 *विधी संघर्ष बालकांकडून, अंबड पोलिसांनी तब्बल ५,४३,०००/- रुपये रोख रक्कम,व ५०,०००/- रुपये किमतीची एक सोन्याची अंगठी केली जप्त, सविस्तर वृत्त असे की, अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखा पथकातील पो.शी. प्रवीण राठोड, यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे, बडदे नगर येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान च्या बाहेर, हातात पिशवी घेऊन काही मुले लाख लाख रुपये वाटून घेण्याच्या गप्पा करत आहेत. त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीमध्ये काहीतरी मौल्यवान वस्तू असल्याची खात्रीलायक बातमी कळताच, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पो.शी.योगेश शिरसाट, पो.शी. मुकेश गांगुर्डे, पो.शी. सचिन कारंजे,पो.शी.तुषार देसले,पो.शी.समाधान शिंदे, यांनी सापळा रचून सदर ठिकाणी मिळून आलेले ४ विधी संघर्षित बालक यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांच्याकडून २००० रुपयांच्या ३० भारतीय चलनी नोटा, तर ५०० रुपये किमतीच्या ९६६ भारतीय चलनी नोटा आणि ५० हजार रुपये किमतीची, १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी मिळून आली. असा एकंदर ०५,९३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मा. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, परिमंडळ ०२, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, नाशिक रोड विभाग अति, कार्यभाग सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर तसेच अंबड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर ( गुन्हे ) याच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे, पंचनामा करून सदर मुद्देमाल हा अंबड पोलीस स्टेशन येथे मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आलेला आहे. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...