काम नाल्याचे, परीक्षा नागरिकांची लक्ष देणार कोण?


 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड): नवीन नासिक, महाराणा प्रताप चौकाकडून पवन नगर कडे जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यात, गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पावसाळी नाला बांधण्याचे काम सुरू आहे, यामुळे रहदारीसाठी हा रस्ता बंद आहे. परंतु हे काम सुरू असताना, महाराणाप्रताप चौकाकडून,पवन नगर किंवा त्रिमूर्तीचौकाकडे जाण्यासाठीचा हा जो मधला रस्ता आहे. दुचाकी आणि चारचाकी अशी शेकडो वाहने आणि परिसरात राहणारे नागरिक प्रवास करत असतात. मात्र या नाल्याच्या कामामुळे चार चाकी वाहनांना मात्र विजयनगर वरून उत्तमनगर आणि पवन नगर असा प्रवास करावा लागत आहे. ज्यामुळे नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास हा तेथील रहिवासी, आणि स्कूलबस व्हॅन चालवणारे वाहनधारक यांना होत आहे, कारण स्थानिक रहिवाशांची मुलं वेगवेगळ्या शाळेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना स्कूल बसणे किंवा व्हॅन ने प्रवास करावा लागतो. हा रस्ता बंद असल्यामुळे स्कूलबस चालकांना लहान मुलांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठा फेरा मारून पुन्हा दुसऱ्या बाजूला यावे लागते. ज्यामुळे वेळही जातो आणि इंधनही जास्त जळते. लहान मुलांची जबाबदारी असल्यामुळे, त्यांना एकटे सोडता येत नाही. कामासाठी कोणतेही नागरिकांचा किंवा स्थानिकांचा विरोध नसून, काम हे अतिशय संथ गतीने सुरू आहे. या ठिकाणी हप्त्यातून एखाद दोन दिवस काम सुरू असते. आणि इतर वेळेस तिकडे कोणतेही काम सुरू नसते. त्यामुळे या कामाला दिवसेंदिवस खूप उशीर होत चाललेला आहे. दुचाकी गाड्यांसाठी पर्यायी मार्ग काढून दिलेला आहे. मात्र तो इतका अरुंद आहे त्यामुळे कित्येक दुचाकींचे अपघात झालेले आहेत. आणि अजूनही कधीही तिकडे अपघात होऊ शकतात. नवीन नासिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक विभाग अधिकारी हेमंत पठे, यांनी संबंधित ठेकेदारास काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. आणि हा रस्ता पूर्ववत रहदारीसाठी मोकळा करून द्यावा अशी नागरिक मागणी करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...