⚡ ब्रेकिंग News

पत्नीच्या त्यागातून पतीला नवजीवन ; मुख्यमंत्री निधी आणि सेवाभावी संस्थांचा मोठा आधार !


 प्रतिनिधी: प्रवीण कासार

अकोल्यातील एका पत्नीने आपल्या निःस्वार्थ प्रेमाची आणि समर्पणाची अनोखी मिसाल घालून दिली आहे. पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने स्वतःच्या यकृताचा म्हणजेच( लिव्हरचा) काही भाग दान केला आणि पतीला नवजीवन दिले आहे. आर्थिक अडचणींवर मात करत ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. 


अकोला येथील ४७ वर्षीय प्रशांत इंगळे हे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २०२५ मध्ये त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तपासणीत त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी झाल्याचे समोर आले.

 डॉक्टरांनी तातडीने लिव्हर प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. 

याच कठीण प्रसंगी पत्नी वर्षा इंगळे यांनी कोणतीही तमा न बाळगता स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २ लाख रुपये आणि टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाल्याने एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला. 

२५ जून २०२६ रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रशांत इंगळे यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून १३ जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.सध्या ते पूर्णपणे बरे होण्याच्या मार्गावर आहेत. 

प्रशांत इंगळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, टाटा ट्रस्ट,डॉक्टर निखिल इंगळे आणि समाजसेवक दत्तात्रेय विभुते यांचे आभार मानले आहेत. ही घटना केवळ एका कुटुंबाला नवजीवन देणारी नाही, तर अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी आणि समाजाला प्रेरणा देणारी ठरत आहे. 

कठीण परिस्थितीत पत्नीने दाखवलेले प्रेम, त्याग आणि धाडस... तसेच शासन आणि सामाजिक संस्थांच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे एका कुटुंबाला नवजीवन मिळाले. अवयवदान हे खऱ्या अर्थाने जीवनदान आहे, हा संदेश देणारी ही प्रेरणादायी घटना आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...