⚡ ब्रेकिंग News

जालन्यात भीषण अपघात… भरधाव क्रेटा कार दहा फूट खोल विहिरीत कोसळली; सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू!


प्रतिनिधी: प्रवीण कासार
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध–वालसावंगी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे.
भरधाव क्रेटा कार तब्बल दहा फूट खोल उघड्या विहिरीत कोसळल्याने कारमधील सासू आणि सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर कारमधील दोन पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, प्रशासन आणि बचाव पथकाने तब्बल पंधरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीतून कार तसेच एका वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उघड्या विहिरींना सुरक्षा कठडे किंवा संरक्षक व्यवस्था नसल्याचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या दुर्घटनेचा पुढील तपास प्रशासन आणि पोलिसांकडून केला जात आहे.
जालना जिल्ह्यातील या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...