⚡ ब्रेकिंग News

NEET UG 2026 चा निकाल जाहीर, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी, देशभरात राज्याची छाप!

 


प्रतिनिधी: प्रवीण कासार 

राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA ने NEET UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. यंदा देशभरातून जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 11 लाख 21 हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे.

यंदाची NEET परीक्षा 21 जून 2026 रोजी देशातील 551 शहरांसह 14 परदेशी केंद्रांवर, एकूण 13 भाषांमध्ये घेण्यात आली होती.

निकालानुसार 138 विद्यार्थ्यांना 690 पेक्षा अधिक गुण, तर 19 विद्यार्थ्यांनी 700 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. 715 पैकी 715 गुणांसह पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पान्शुल बन्सल संयुक्तपणे देशात अव्वल ठरले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 58 टक्क्यांहून अधिक मुली असून, मुलींचे यशाचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे.

NTA च्या माहितीनुसार, 705 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अव्वल 17 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

NEET निकालानंतर आता वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत NTA आणि MCC संकेतस्थळांवरील माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...