⚡ ब्रेकिंग News

कत्तलीपूर्वीच पोलिसांचा छापा! 10 गोवंश जनावरांची सुटका, काल्या उर्फ इर्शाद कुरेशी ताब्यात


 



जनार्दन गायकवाड :

नाशिक शहरातील निमसेमळा परिसरात गोवंश जनावरांच्या अवैध वाहतूक व कत्तलीच्या तयारीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखा युनिट-1 ने केलेल्या कारवाईत तब्बल 10 जिवंत गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून एक आरोपी आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कमलवाडी, निमसेमळा, नाशिक येथे असलेल्या एका गोठ्यात गोवंश जनावरे कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. 

या कारवाईदरम्यान पोलिसांनी काल्या उर्फ इर्शाद अब्दुल रहमान कुरेशी (वय 38 वर्षे, रा. सावर्कर गार्डन, दिंडोरी रोड, नाशिक) याला ताब्यात घेतले. चौकशीत ही जनावरे नाझीम शेख आणि एका विधिसंघर्षित बालका मार्फत आणल्याचे समोर आले. पुढील तपासात ही जनावरे कत्तलीसाठी संगमनेर येथे नेण्याची तयारी सुरू असल्याचे निष्पन्न झाले. 

पोलिसांनी गोठ्यातून सुमारे 1 लाख 90 हजार रुपये किंमतीची 10 गोवंश जनावरे ताब्यात घेतली. या जनावरांना सुरक्षिततेसाठी कृषी गोसेवा ट्रस्ट, तपोवन, नाशिक येथे सुपूर्द करण्यात आले आहे. 

या प्रकरणी आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीला आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने केली. 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...