⚡ ब्रेकिंग News

पंचवटी पोलिसांची कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त, महिला आरोपी जेरबंद


वार्ताहर प्रवीण कासार :

नाशिक शहरातील पंचवटी पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या एका महिला आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई २५ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तपोवन कॉर्नर परिसरात करण्यात आली. 

लता उर्फ ताराबाई सोनू रामचंद्र चौरे , वय ४६ वर्षे, रा. बी. टी. हौसिंग, पाण्याच्या टाकीजवळ, वडाळा, पंचवटी, नाशिक. हिच्याकडून 
१०.२५१ किलो गांजा – किंमत अंदाजे ₹२,९०,०००
रेडमी कंपनीचा मोबाईल फोन व इतर एकूण ₹३,१०,९९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब))(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही मुंबईतील वरळी पोलीस ठाणे आणि कसारा पोलीस ठाण्यात एनडीपीएसचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...