नवीन नासिक भगतसिंग नगर वसाहतीतील स्वच्छतागृहाचा प्रश्न ऐरणीवर



 मुख्य संपादक( जनार्दन गायकवाड ): नवीन नासिक मुंबई महामार्ग फ्लाय ओव्हर ब्रिजच्या लगत,वंचित समाजातील, एक मोठा वर्ग लोक वस्ती  आहे, किमान २ हजार लोकवस्ती असलेल्या या  भगतसिंगनगर वसाहतीत, नवीन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने एक स्वच्छतागृह गृहनिर्माण करण्यात आले आहे. त्याच्यावर मोठ्या अक्षरात स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक असे स्लोगन देखील घेण्यात आले आहे. हे स्वच्छतागृह कशासाठी की नागरिकांचा स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागावा. रस्त्यावर किंवा उघड्यावर,या, महिला,लहान मुले , पुरुष,वयोवृद्ध, यांचा स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागावा परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून या स्वच्छतागृहाकडे नवीन नाशिक महानगरपालिका पूर्व विभागाचे अतिशय दुर्लक्ष आहे, या संडास बाथरूम मध्ये, अतिशय अस्वच्छता आहे, सर्व बाथरूम चोकअप आहेत, जिथे उभेही राहू शकत नाही तिथे या महिला किंवा पुरुष स्वच्छतागृहात जाणार कसे हा सर्वात मोठा प्रश्न उभा आहे? सर्वत्र अतिशय दुर्गंधीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. संबंधित आरोग्य खात्याला या वंचित लोकांकडे बघायला वेळ नाही का? सध्याच्या काळामध्ये, महानगरपालिकेवर नगरसेवक नसल्यामुळे फक्त प्रशासकीय राज्य चालू आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील या परिसराकडे दुर्लक्ष केले जाते. असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. विभागीय अधिकारी सुनील आव्हाड यांनी याबाबतीत स्वतः लक्ष घालून आरोग्य विभागाला आदेश दिले पाहिजे की पूर्व विभागातील स्वच्छतागृहे हे वेळोवेळी साफ केले गेले पाहिजे. आणि आरोग्य विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी जर आपली जबाबदारी टाळत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...