⚡ ब्रेकिंग News

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने नायगाव येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विनम्र अभिवादन*

 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नायगाव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळास भेट देत विनम्र अभिवादन केले.

 यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, अॅड. सुभाष राऊत, प्रा.दिवाकर गमे, राजेंद्र नेवसे, समाधान जेजुरकर, अॅड. चंद्रशेखर भुजबळ, संतोष खैरनार, पुणे महिला शहराध्यक्ष वैष्णवी सताव, नायगावच्या सरपंच साधना नेवसे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतांना छगन भुजबळ म्हणाले की, व्यवस्थेच्या अंधकरात अडकलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन समाजाच्या मुख्य समाजात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा  फुले यांच्या साथीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. सर्व समाजातील महिलांना शिक्षणाचे कवाड खुल करून दिलं. त्यामुळे चूल आणि मूल या चार भिंतींच्या आत अडकलेल्या महिलांना समाजात सर्व स्तरांत मुक्तपणे संचार करणे शक्य झालं. त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत आहे. त्यांनी केलेलं हे कार्य चिरकाल स्मरणात राहील. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा  फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करतो असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...