नाशिक ग्रामीणच्या हरसुल पोलिसांनी रोड रॉबरी प्रकरणाचा यशस्वी तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. पाच जून रोजी फायनान्स कंपनीचे कर्मचारी नवनाथ मोरे हे महिला बचत गटाचे ८४ हजार ८८० रुपये आणि टॅब घेऊन जात असताना आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बॅग हिसकावून पलायन केले होते.
या प्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
1)योगेश फसाडे, 2)जयराम पारधी आणि 3)सोपान पारधी या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, टॅब, तीन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण तीन लाख त्रेसष्ट हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
إرسال تعليق