⚡ ब्रेकिंग News

बैठकीनंतर काही तासांतच ४५ लाखांच्या लाचप्रकरणी विभागीय वन अधिकारी ACBच्या जाळ्यात!





विशेष प्रतिनिधी – प्रवीण कासार 

बीड जिल्ह्यातील प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनैना पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर अवघ्या काही तासांतच विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्यावर ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. ACBच्या पथकाने त्यांच्या राहत्या घरी सापळा रचून कारवाई केली आणि त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे वन विभागासह संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास ACBकडून सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर काही तासांतच झालेल्या या ACB कारवाईमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींवर काय कारवाई होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...