राजस्थानहून आलेल्या एमडी( मेफेड्रोन ) तस्करांना नाशकात अटक, दोन कारवायांमध्ये 18 लाख 35 हजाराचा ड्रग्ज जप्त

मुख्य संपादक: जनार्दन गायकवाड 


नाशिक - नाशिक शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत राजस्थानहून मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 18 लाख 35 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 320.35 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत.

● 18 जून 2026 रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, राजस्थानातील काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी नाशिक रोड परिसरात येणार आहेत.
● माहितीची तात्काळ दखल घेत अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुंडा विरोधी पथकाने उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रधाननगर परिसरात सापळा रचला.
● दरम्यान, संशयित मोटारसायकल क्रमांक MH-15 BB 6647 वरून आलेल्या दोन व्यक्तींना थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

● पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 200 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत 10 लाख 70 हजार रुपये असल्याचे समोर आले आहे.

● पुनाराम हिराराम बिश्नोई (वय 36 वर्षे), रा. जोधपूर, राजस्थान
● श्रवणकुमार लाखाराम बिश्नोई (वय 29 वर्षे), रा. जोधपूर, राजस्थान
● या दोघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 त्याचबरोबर दुसरी कारवाई
● उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माधव लॉन्सजवळील एका घरावर छापा टाकण्यात आला.
● या कारवाईत सुरेश पुनाराम गोडारा (वय 27 वर्षे), रा. माधव लॉन्सजवळ, नाशिक रोड याच्या ताब्यातून 120.35 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
● जप्त केलेल्या एमडीची किंमत 6 लाख 1 हजार 750 रुपये असून अन्य 93 हजार 300 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.

● दोन्ही कारवायांमध्ये एकूण 320.35 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त.
● एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 18 लाख 35 हजार 50 रुपये इतकी वर्तविली जात आहे. 
● तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे 
● न्यायालयाने तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

नाशिक शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा आळा बसला असून "नशामुक्त भारत अभियान" अंतर्गत पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...