⚡ ब्रेकिंग News

मिरा रोडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; स्कूल बस थोडक्यात बचावली!


 प्रतिनिधी: प्रवीण कासार 

मिरा रोड : मिरा-भाईंदर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामादरम्यान अचानक स्लॅबचा काही भाग खाली कोसळला. याचवेळी खाली रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस जात होती.

सुदैवाने मेट्रोचा स्लॅब बसवर थेट न पडता बसच्या अगदी जवळ कोसळला आणि मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

ही घटना मिरा रोड पूर्वेकडील गोल्डन नेस्ट परिसरात, मिरा-भाईंदर रोडवर घडल्याची माहिती समोर आली आहे. स्लॅबचा मलबा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मलबा हटवण्याचे काम सुरू केले.

या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सुरू असलेल्या मेट्रो कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, नेमका स्लॅब कोणत्या कारणामुळे कोसळला, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

थोडक्यात... काही सेकंदांचा फरक आणि मोठा अनर्थ टळला! शाळकरी विद्यार्थ्यांची बस पुढे गेल्यानंतर मेट्रोचा स्लॅब खाली कोसळल्याने विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात बचावला.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...