#नाशिकमध्ये चेन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद, 17.95 लाखांचा मुद्देमाल जप्त – सहा गुन्हे उघड!

संपादकीय :
नाशिक शहरात साखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हेशाखा युनिट क्रमांक 2 ला मोठे यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून तब्बल 17 लाख 95 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहरातील सहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून 2026 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपनगर परिसरात फिर्यादी महिला घराजवळ शतपावली करत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेशाखा युनिट-2 ने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. अखेर सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. 


अनिल उर्फ बाळा सखाराम डिग्रसकर, वय 33 वर्षे, रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, जेलरोड, नाशिक.
कन्हैया विजय पाटील, वय 36 वर्षे, रा. सोहम सोसायटी, हरिकूलनगर, नाशिकरोड. 

आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, दोन महागडे मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली ज्युपिटर मोपेड आणि एक हुंडाई आय-10 कार असा एकूण 17 लाख 95 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबावरून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये उपनगर पोलीस ठाणे – 3 गुन्हे, इंदिरानगर पोलीस ठाणे – 1 गुन्हा, गंगापूर पोलीस ठाणे – 1 गुन्हा आणि म्हसरूळ पोलीस ठाणे – 1 गुन्हा, अशा एकूण 6 साखळी चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत. 

ही कारवाई गुन्हेशाखा युनिट-2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकाने केली. 

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...