⚡ ब्रेकिंग News

*अंबड पोलीस स्टेशन हद्दीत, कामटवाडे शिवारात स्कार्पिओ ची चोरी*


 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड ): अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. खून, दरोडे, घरफोड्या, वाहन चोऱ्या, गुंडागर्दी, काही कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या दोन महिने आधी दिवाळीच्या सुमारास अशाच प्रकारे एकाच रात्री अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी, अश्विनी नगर, सायखेडकर हॉस्पिटल च्या मागे कामटवाडे शिवार, तसेच खुटवडनगर घरफोड्या करून लाखो रुपयांचे सोना चांदी आणि कॅश स्वरूपात लाखो रुपयांच्या घरफोड्या करून फरार आहेत. आजपर्यंत त्यातील आरोपी पोलिसांना सापडलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तसेच गेल्या तीन दिवसा आधीच गुंडांनी कोयते नाचवत सिडको परिसरात तीन ठिकाणी दहशत माजवली होती.त्यातच अजून भर म्हणून ते काय आता घराच्या पार्किंग मध्ये लावलेल्या, दुचाकी वाहने चोरीला तर जातच होते, परंतु चार चाकी वाहन देखील आता सुरक्षित नाही. असाच एक चार चाकी वाहन चोरीला जाण्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन नाशिक शहरात, कामटवाडे परिसरात स्कॉर्पिओ वाहन अज्ञात चोरट्याने बिल्डिंगच्या पार्किंग मधून दिनांक 02/ 01/ 2023 रोजी रात्री 11:30 ते दि. 03/01/2023 रोजी सकाळी 06:30 वाजेच्या सुमारास नेहेते कुटुंब राहत असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंग मधून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात नाव -ललित जनार्दन नेहेते वय 34 , राहणार 4 A देवन कॉम्प्लेक्स, युनियन बँके शेजारी कामटवाडे शिवार नाशिक, वाहन नंबर MH15- GX-1831 महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ S10 जीप चोरी गेल्याची तक्रार अंबड पोलिसात दाखल केली आहे. सदर घटनेची माहिती मिळतच अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक निंबाळकर, आपल्या पोलीस पथकासह दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेऊन, अंबड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे रजिस्टर नंबर 0007/2023 भा.द.वि.क 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार झोले, बॅच नंबर 412 करीत आहे. या सर्व घटना बघता, अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...