*ॲड. मिलिंद मोरे यांनी, हाती घेतलाय उत्कृष्ट उपक्रम*


 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड ): नाशिक शहरातील जिल्हा न्यायालयात सन 2011 पासून कार्यरत असलेले ॲड.मिलिंद मोरे,यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, 2023 नववर्षाच्या सुरुवातीला एक अतिशय उत्कृष्ट असा संकल्प केलेला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांनी समाजावर कधी न फिटणारे उपकार केलेले आहेत, भारत देशाला संविधान देऊन, समाजातील रंजल्या, गांजल्या समाजाला माणसात माणूस म्हणून बसवले. परंतु आजही काही ठिकाणी बघितले तर, दलित समाजावर अन्याय होताना दिसतो. आणि पैशाअभावी अशा लोकांना योग्य न्याय मिळणे शक्य होत नाही, कारण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. काही ठिकाणी अल्पसंख्यांकांच्या मुलांवर खोट्या केसेस दाखल केल्या जातात. काही केसेस मध्ये बघितले तर, तरुण मुले पैशाच्या अभावी गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत, कारण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आणि एकदा ते मुलं जर अटकले तर त्यांचं पुढचं आयुष्य अंधारात जाते. एक तर पैसा नसतो.त्यामुळे ज्या महामानवांनी महात्मा ज्योतिबा फुले.सावित्रीबाई फुले.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांनी समाजासाठी स्वतःच्या घरादाराची परवाना करता. आपले संपूर्ण आयुष्य वेचले.संपूर्ण मागासवर्गीय समाजाला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. मी देखील आज जे काही आहे. मी जे शिक्षण घेऊ शकलो. आणि आज समाजात उंच मानेने चालू शकतो ते फक्त त्यांच्याच कृपेमुळे आहे. त्यामुळे आपणही समाजाचे काही देणे लागतो, या पार्श्वभूमीवर मी ॲड. मिलिंद मोरे, मी आज रोजी भीमा कोरेगाव च्या बलिदानाला वंदन करून, आपल्या सर्वांना एक वचन देतो की आज रोजी, समाजातील ज्या मुलांवर व्यक्तींवर खोट्या क्रिमिनल केसेस दाखल केलेले असतील. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कुठल्याच प्रकारची फी आकारणार नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहेत आपल्यावर, त्याची छोटीशी ट्रेड म्हणून हा उपक्रम मी हाती घेतलेला आहे. या संदर्भात आपण मला कधीही संपर्क करू शकता. दूरध्वनी क्रमांक : 9960988843, ऑफिस-(FE-5 and 12 ठक्कर बाजार नाशिक ) ज्या कोणालाही मदतीची आवश्यकता असेल त्यांनी त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून किंवा त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना समक्ष भेटू शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...