नाशिक : नाशिक महानगरपालिका हद्दीत बंदी असलेल्या घातक नायलॉन मांज्याची छुप्या पद्धतीने विक्री सुरु असून ह्या मांज्यामुळे अनेक दुचाकी स्वार तसेच रस्त्यांवरून जाणारे नागरिक जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. ह्या पूर्वीही नायलॉन मांज्यामुळे अनेक दुचाकी स्वारांना गळा चिरल्यामुळे गंभीर दुखापत झाली असून नायलॉन मांज्यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीविताला गंभीर स्वरूपाचा धोका संभवत आहे. प्रशासनातर्फे दर वर्षी मकर संक्रांतीच्या काळात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री थांबविण्यासाठी जनजागृती करण्यात येते. मात्र छुप्या स्वरुपात नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊन नागरिक व निष्पाप पक्षी ह्या मांज्यामुळे जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. मनसेतर्फे नागरिकांमध्ये नायलॉन मांजाची उत्पादन व विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची माहिती उघड करून प्रशासनास सहकार्य करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या जिविताशी खेळणाऱ्या व्यावसायिकांवर तात्काळ कडक कारवाई करून ह्या अनिष्ठ प्रवूत्तीस तात्काळ पायबंद घालावा असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मा. पोलीस उपायुक्तांना देण्यात आले. या वेळी मा. पोलीस उपायुक्तांनी याबाबत तात्काळ योग्यती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुशभाऊ पवार, शहराध्यक्ष दिलीपभाऊ दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलिम (मामा) शेख, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, योगेश लभडे, नितीन माळी, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, विजय आहिरे, सचिन सिन्हा, अक्षय खांडरे, विनायक पगारे, भाऊसाहेब ठाकरे, विजय रणाते, शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे, ज्ञानेश्वर बगडेआदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

إرسال تعليق