मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड) : जुने सिडको ,भुजबळ फार्म परिसरात गेल्या दोन दिवसापासून एक गोऱ्हा जखमी अवस्थेत फिरत होता त्याच्या पायाला अतिशय मोठी जखम झालेली होती, त्या बद्दल काही स्थानिक नागरिकांनी राहुल गणोरे (सामाजिक कार्यकर्ते, उपाध्यक्ष भाजपा मंडल सिडको) यांना कळविले, राहुल गणोरे यांनी त्वरित सर्व परिस्थिती बघता, मंगलरूप गोशाळा सेवा ट्रस्ट व नागरिकांच्या सहकार्याने त्याला पकडले व गोशाळेत पाठवून उपचार सुरु केले. निश्चितच त्याच्यावर उपचार होऊन त्याची जखम बरी होऊन त्याचा जिव वाचेल या भावनेने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि राहुल गणोरे , मंगलरूप गोशाळाट्रस्ट व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
प्रसंगी पुरुषोत्तम आव्हाड, बाबू काका पिल्ले, लक्ष्मण विसपुते, मिलिंद भार्गव ,बिलाल सय्यद व परिसरातील नागरिक उपस्थित होते


إرسال تعليق