⚡ ब्रेकिंग News

*अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची तडकाफडकी बदली*


 


मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड):                              नवीन नासिक अंबड पोलीस स्टेशन  वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची तडकाफडकी बदली, गेल्या वीस दिवसांपूर्वी आमदार नितीश राणे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आणि पोलीसनाईक प्रशांत नागरे, यांच्या संगनमताने अवैद्य धंद्यांवरून हप्ता वसुली केली जात असल्याचे आरोप उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सभागृहात आरोप केले होते . त्यावेळी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत नागरे यांचे तडका फडकि बदली केली जाईल व ईडीजीमार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची देखील चौकशी केली जाईल असे सभागृहाला आश्वासन दिले होते. आज रोजी दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी पोलीस मुख्यालयातील आदेशावरून भगीरथ देशमुख यांची अंबड पोलीस स्टेशन येथून  तडकाफडकी बदली करण्यात आली असून, अंबड पोलीस स्टेशन चा चार्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक  नंदन बगाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...