संपादकीय - जनार्दन गायकवाड
नासिक शहरात शाळा कॉलेजेस च्या समोर उभे राहून शालेय विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार फारच वाढत चालले होते. त्यात विद्यार्थिनींची छेड काढणे, शालेय विद्यार्थ्यांना टोळक्यांकडून मारहाण अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या.
आता मात्र नासिक पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे, सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कालच अशा टवाळखोरांवर कारवाई करत जरब बसवण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या कारवाईतून दिसून आले तर पाठोपाठ अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या आदेशाने गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाईदा शेख, यांच्या टीमने उत्तम नगर कॉलेज परिसरात अशाच टवाळखोरांना आपल्या दंडूक्याचा प्रसाद वाटप केले.
अंबड पोलिसांच्या या कारवाईचे उपस्थित नागरिकांकडून विशेषतः महिला वर्गाकडून भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच अशाच प्रकारच्या कारवाया वारंवार करण्यात याव्यात जेणेकरून अशा रोडरोमिओ टवाळखोर यांना आळा बसेल अशा प्रतिक्रिया येत आहेत.


Post a Comment