नाशिक शहरात अजून किती ? बिबटे



 संपादक - जनार्दन गायकवाड 

 इंदिरानगर : नासिक शहरात अजून किती बिबटे नागरिकांना पडलेला प्रश्न? वनविभागाने रेस्क्यू केलेले हिंस्र प्राणी सोडतात कुठे ?  रेस्क्यू केलेल्या हिंस्र प्राण्यांच्या गळ्यात ट्रॅकिंग  डिवाइस टाकले जावू शकत नाहीत का? जेणेकरून नागरी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांची माहिती मिळू शकेल असा अतिशय महत्त्वाचा प्रश्न नागरिकांना कडून विचारला जात आहे.

 गेल्या चार दिवसांपूर्वीच सिडको आणि इंदिरानगर अशा दोन परिसरात दोन नर मादी जातीचे बिबटे वन विभागाकडून जर बंद करण्यात आले होते. पुन्हा स्वारबाबा नगर निगळमळा येथे देखील दोन दिवसांपूर्वी बिबट्याने आपले दर्शन दिल्याने निगळमळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. गणेश निगळ यांनी या संदर्भात पोलीस तसेच वन विभागाला कळविले देखील होते. आणि आज पाथर्डी शिवारात पुन्हा एक बिबट्या जेरबंद करण्यात आला. ही बाब अतिशय धक्कादायक आहे. कारण याच परिसरात शिवपुराण महाकथा कार्यक्रम सुरू असून नासिक शहरासह महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत. आजूबाजूला असलेल्या मळे परिसरामध्ये जर अजून काही हिंस्र प्राणी असतील आणि अचानक या  प्राण्यांनी शिवपुराण महाकथेच्या सभा मंडपाकडे प्रस्थान केले तर किती मोठी भयानक परिस्थिती समोर उभी राहील, याबाबतीत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून बंदोबस्त करायला हवा अन्यथा नाहग नागरिकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. शिवाय या परिसरात वावरणाऱ्या नागरिकांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी.

 पाथर्डीगाव येथील संजय गंगाधर नवले यांच्या नवलेमळा येथे (दि. २३) पहाटेच्या सुमारास बिबट्या असल्याची वनविभागास माहिती मिळताच, संबंधित कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्यास रेस्क्यू केले आहे. बिबट्या सध्या वनविभागाच्या ताब्यात सुरक्षित आहे.


पाथर्डी परिसरातील गट नंबर २१६ मध्ये आज पहाटेच्या सुमारास संजय गंगाराम नवले यांच्या मळ्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, मागील पंधरा-वीस दिवसांपासून बिबट्या या परिसरात फिरत होता. त्यामुळे मळेधारकांनी व ग्रामस्थांनी याची कल्पना वनविभागाला दिली होती. वनविभागानेही बिबट्याच्या पायाचे ठसे लक्षात घेऊन पिंजरा लावलेला होता. तरीही मळे परिसरात राहत असलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याची भीती जाणवत होती. त्यामुळे वनविभागाने गांभीर्याने ही बाब लक्षात घेऊन त्याच्यावर पाळत ठेवली होती.


तसेच या भागातील बरेच (मनुष्यवस्ती) शेतकरी मळे भागात राहत असल्याने त्यांच्या लहान मुलांना शाळेत जावे लागते. तसेच महिलांना दिवसभरात शेतामध्ये काम करावे लागते. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याची भीती मळेभागात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्याच अनुषंगाने वनविभागाने दोन-तीन दिवसांपूर्वी नवले यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता.


दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे विजय पाटील, अनिल अहिरराव, अशोक खानझोडे व इतर

सहकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.


तर वनविभागाने बिबट्याला जेरबंद केल्याने मळेधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...