लातूर (औसा) प्रतिनिधी : बाळकृष्ण कदम
औसा येथे शरदचंद्रजी पवार गटाचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शेटे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख सर जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत भाऊ सूर्यवंशी व औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती योगीराज काका पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांची निवड झाल्याबद्दल औसा विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सर्व टीमने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. औसा विधानसभा अध्यक्ष अशोक चंद्रकांत गरड पाटील औसा विधानसभा कार्याध्यक्ष किशन मारुती भांगे व औसा विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचं अभिनंदन केलं व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

إرسال تعليق