नाशिक शहर तेली समाज राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न



संपादकीय : नाशिक

३५ वर्षे सातत्याने आयोजित केला जाणारा वधू-वर मेळावा दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी श्रध्दा लॉन्स नाशिक येथे प्रचंड उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी १५०० वधू व १६०० वरांनी सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला. ३१०० वधू-वरांसह सुमारे १५००० पालकांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ट पोलिस निरीक्षक श्री. शेखर बागडे यांनी केले. मेळाव्याचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष श्री. गजानन शेलार यांनी मार्गदर्शन केले. पालकांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की अपेक्षांचे अवडंबर न करता फक्त सुयोग्य जोडीदार निवडा. वधू पिता वरांची निवड करतांना, त्याला घरदार, चांगल्या पगाराची अपेक्षा करतात, परंतू सर्वांना हे शक्य नाही. म्हणून समजूतदार पणा ठेवून जावई किंवा सून निवडा.


या मेळाव्याचे वैशिष्ट म्हणजे कॅप्टन गौरी महाडिक यांनी उपस्थितीतांना मौल्यवान मार्गदर्शन केले. त्यांच्या पतींना हवाई दलात देशासाठी सेवा करतांना निधन झाले परंतू त्यांनी पती निधनाचा धक्क्यातून स्वतःला सावरून स्वतः हवाई दलात दाखल झाल्या व खडतर प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचे जिवन देशाच्या सेवेत समर्पित केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून मार्गदर्शन केले. स्वतः खुप अपेक्षा न ठेवता एका छोट्या फ्लॅट मध्ये संसार सुरु केला तो नियतीच्या घाल्याने अवघ्या दोन वर्षात उध्दवस्त झाला परंतू दुःखाचे भांडवल न करता देशसेवेत सामिल झाल्या म्हणून मोठ्या अपेक्षा न ठेवता एकत्र कुटूंबानी कास धरा पुढे नशीबात काय घडेल याची शाश्वती नाही. म्हणून चांगला पगारदार, घरदाराची अपेक्षा न करता लग्नानंतर प्रॉपर्टी करा असा सल्ला दिला.


मेळाव्यासाठी गेले चार महिने शेकडो कार्यकर्ते राबत होते. केंद्रस्थानी श्री सुनिल शिरसाठ व पुस्तिका प्रमुख श्री. सुधाकर देसाई यांनी अथक परिश्रम घेतले. मेळाव्याचे मार्गदर्शक श्री. भानुदासशेठ चौधरी यांनी सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करून विविध समित्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा संघ उभा केला.


या मेळाव्यात माजी महापौर यतिनजी वाघ, अॅड राजेंद्र वाघ, भाजपाचे नेते विक्रांतजी चांदवडकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त स्वप्नील शेलार, तेली समाज अध्यक्ष उत्तमराव सोनवणे मेळावा संयोजक मिलींद वाघ, माजी उपमहापौर सुमनताई बागले, भाजपा नेते श्री. सुरेश आण्णाजी पाटील, जी.एम. जाधव, संपादक अशोक चौधरी, डॉ. शरद जाधव, महिला कार्यकर्त्या सौ. वैशाली शेलार, सौ. उषाताई शेलार, सौ. हितेश यतीन वाघ, इ. मान्यवर उपस्थित होते.


मेळाव्याचे सुत्र संचालन सौ. सिमाताई पेठकर व सौ. योगिता क्षिरसागर यांनी केले.


मेळावा उद्घाटन व पुस्तिका प्रकाशन झाल्यानंतर संयोजक श्री. सुनिल शिरसाठ यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर उपस्थिती वधू-वरांच्या परिचयाला सुरुवात झाली. सुमारे तीन हजार वधू-वरांनी प्रत्यक्ष परिचयात सहभाग नोंदवला. उपस्थितीतांसाठी सुरुची भोजन व चहापाणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.


या मेळाव्यासाठी, वधू वर नोंदणी समिती, भोजन समिती, पुस्तिका छपाई समिती, वधू-वर सूची वितरण समिती, चहापान समिती, सुरक्षा व्यवस्था यासाठी चारशे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...