दिनांक - 21/06/2026
नाशिकच्या मुंबईनाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तडीपार आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवत अवैध शस्त्रे जप्त करून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
- विष्णू किसन पवार (वय 30, भारतनगर) याला लोखंडी कोयत्यासह अटक करण्यात आली.
- समीर मुन्ना शहा (वय 29, शिवाजीवाडी, भारतनगर) याला देखील कोयत्यासह ताब्यात घेण्यात आले असून त्याचा पूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे.
- नंदिनीनगर येथील घरफोडी प्रकरणात वसीम अब्दुल रेहमान (वय 27, शिवाजीवाडी, भारतनगर) याला अटक करून चोरीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
- दुसऱ्या घरफोडी प्रकरणात तौफिक हसन शहा (वय 19, भारतनगर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १,१०० रुपये रोख व तीन मोबाईल फोन असा २४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मुंबईनाका गुन्हेशोध पथकाने केली.
Post a Comment