⚡ ब्रेकिंग News

विसरवाडी पोलिसांची मोठी कारवाई 30 लाख 40 हजाराचा प्रतिबंधित गुटखा / तंबाखूचा साठा जप्त


 प्रतिनिधी: भगवान खरे कळवण 
विसरवाडी - नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिसांनी अवैध तंबाखू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 30 लाख 40 हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व आयशर टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईमुळे तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, गुजरात राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक आयशर टेम्पो (क्र. DD-01-F-9752) मधून केली जात आहे. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्याम पेढारे, राजू कोकणी आणि धीरेंद्र शिंदे यांनी धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावरील समेजा हॉटेलजवळ सापळा रचला.

संशयित वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहनाची झडती घेतली असता 55 प्लास्टिक गोण्यांमध्ये सुमारे 12 लाख रुपयांचा ‘रिमझिम जर्दा’ सुगंधित तंबाखू आणि 3 लाख 30 हजार रुपयांचा ‘गोल्डन सफारी जर्दा’ सुगंधित तंबाखू आढळून आला. वाहनासह एकूण 30 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी वाहनचालक सलीम खान बाबू खान (रा. मेकाणीयो की ढाणी, जि. बाडमेर, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अन्य सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहीदास डौले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अवैध तंबाखू तस्करीवर विसरवाडी पोलिसांचा करडा बडगा कायम असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...