⚡ ब्रेकिंग News

राजकीय वर्तुळात प्रभाव निर्माण करत राजकीय सूत्रधार बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे मनोहर मामा यांच्या अडचणीत वाढ!



 प्रतिनिधी: प्रवीण कासार 

 सोलापूर ग्रामीण- स्वतःला बाळूमामांचा अवतार म्हनवणाऱ्या तथाकथित भोंदू बाबाचा पर्दाफाश ; कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(१), ३१८(४), ३(५) तसेच इतर लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मनोहर मामा यांच्या आश्रमात विविध पक्षांतील अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर येत असल्याची चर्चा होती. त्यांच्यासोबतचे छायाचित्रे आणि भेटी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. मात्र, अशा भेटींमुळे संबंधित व्यक्तींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे सिद्ध होत नाही.

तक्रारीनंतर पोलिसांनी आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि इतर संबंधित बाबींची चौकशी सुरू केली आहे. उपलब्ध महसूल कागदपत्रांनुसार मनोहर भोसले यांच्या नावाशी संबंधित सुमारे २८ एकर शेती, तसेच फ्लॅट, प्लॉट आणि इतर स्थावर मालमत्तेची नोंद असल्याचे समोर आले आहे. या सर्व मालमत्तेची, त्यासाठी वापरण्यात आलेल्या आर्थिक स्रोतांची आणि व्यवहारांची पडताळणी तपास यंत्रणांकडून केली जात आहे.

याशिवाय तक्रारदारांचे जबाब, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, महसूल अभिलेख आणि इतर पुरावे तपासले जात असून, तपासात पुढे आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, तपासातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...