⚡ ब्रेकिंग News

मालकाच्या घरातून नोकराने चोरलेले १४.३० लाखांचे ११ तोळे सोने १२ तासांत हस्तगत!

नाशिक | संपादक: जनार्दन गायकवाड 

मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या १२ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणी घरात काम करणारी महिला नोकर दर्शना गंगाराम गांगुर्डे (वय २०, रा. चुंचाळे, अंबड, नाशिक) हिला अटक करण्यात आली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी चौक परिसरातील एका घरातून २८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास १४.३० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. फिर्यादीला घरात काम करणाऱ्या महिलेवर संशय आल्याने मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्ह्याचा तपास सुरू करताच गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिलेला ताब्यात घेतले. महिला पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपीने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले सर्व ११ तोळे सोन्याचे दागिने जसेच्या तसे जप्त करण्यात आले. 

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या नेतृत्वात मुंबईनाका गुन्हे शोध पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...