1 जानेवारी, शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे जयतयारी

 

 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड ): #1जानेवारी १८१८ च्या लढ्यातील शुरवीर महार योद्यांना अभिवादन करण्यासाठी येणार्या भिमअनुयायांना सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणुन राज्य शासना अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख ( भा. प्र. से. ) यांचे अध्यक्षते खाली तब्बल १० हजाराच्या संख्येने संपुर्ण प्रशाकीय अधिकारी व कर्मचार्यांची टिम कार्यरत आहे. जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणुन आपण केलेले प्रयत्न यशस्वी होत आहेत. यंदाच्या नियोजनात महिला अनुयायांच्या वाढत्या संख्येची नोंद घेवुन महिलांसाठी विशेष नियोजन केले जात आहे. हिरकणी कक्ष ते बसण्यासाठी स्वतंत्र मंडप , पिण्याच्या सिलबंद बॉटल पासुन ते मास्क पर्यंतची व्यवस्था केलेली आहे. 


कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होवु नये तसेच अनुयायांना कोणताही त्रास न होता जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणुन पुणे सहपोलिस आयुक्त संदिप कर्णिक ( भा. पो. से. ) हे त्यांच्या संपुर्ण टिमसह अत्यंत सुक्ष्म नियोजन करित आहेत. 


कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन व आखणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण ( बार्टी ) चे महासंचालक धम्मज्योती गजभिये हे देखिल सातत्याने बैठका घेत आहेत. प्रत्तेक बाबींवर बारकाईने लक्ष देवुन नियोजन करत आहेत. अनुयायंसाठी पाणी व यासंपुर्ण उत्सवासाठी पाच कोटींपेक्षा अधिकचा तातडीचा खर्च बार्टी मार्फत केला जात आहे.( सदर रकमेची तरदुद बार्टी स्वंतत्रपणे करत आहे.) 


सर्व पक्ष संघटना आपल्या सभांचे व कार्यक्रमांचे नियोजन करत आहे. 


आपन कोणत्याही अफवांना बळी न पडता अत्यंत आनंदाने अभिवादनासाठी शौर्यभुमी कोरेगावभिमा विजयस्तंभ पेरणे येथे १ जानेवारीला उपस्थित रहावे हि विनंती.

राहुल डंबाळे, अध्यक्ष 

भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती. 

9822917119

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...