*हिंदू स्मशानभूमीचे कंत्राट, कित्येक वर्षांपासून महानगरपालिकेच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्ट दारालाच का?*


 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड) :नवीन नाशिक महानगरपालिका हद्दीत, मोरवाडी स्मशानभूमी, आणि मोरवाडी दफनभूमी, अशा दोन अंत्यविधीसाठी व्यवस्थापना आहेत. परंतु गेला कित्येक वर्षांपासून, नवीन नासिक महानगरपालिकेचे लाडके कॉन्ट्रॅक्टदार मनियार यांनाच या दोन्हीही व्यवस्थापनांचे कॉन्ट्रॅक्ट दिले जाते प्रश्न आहे का? लागणारी सामग्री, जसे मोठ मोठाल्या झाडांची लाकडे, हे कापून अंत्यविधीच्या ठिकाणी ठेवण्याचे काम, अमरच्या व्यवस्थापनाचे आहे. दफनभूमी मध्ये त्यांचा हस्तक्षेप नको? मोरवाडी गाव येथे अमरधामला लागूनच मोरवाडी गाव वासियांची दफनभूमी आहे. त्या दफनभूमीत त्यांचे पूर्वज दफन आहेत. मग ते लहान बालके असतील. मानभाव पंथाचे देखील व्यक्ती त्याच दफनभूमीत दफन केल्या जातात. परंतु एक गैर हिंदू व्यक्ती मोरवाडी ग्रामस्थांच्या दफनभूमीत अतिक्रमण करत आहेत. नगरसेवक झोपले, महानगरपालिकेचे अधिकारी डोळ्याला भातबांधून बसले, कारण कंत्राट दाराकडून कित्येक वर्ष लाच घेणारे अधिकारी त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकत नाही. आज कित्येक वर्षांपासून मोरवाडी ग्रामस्थांच्या दफनभूमीमध्ये, दफन असलेल्या त्यांच्या पूर्वजांच्या थडग्यांवर, अमरधाम येथे व्यवस्थापक मनियार नामक व्यक्ती, संपूर्ण घाण कचरा टाकत आहे. बाहेरून आलेले झाड त्यांचे लाकडं, आणि त्यांचे संपूर्ण वेस्टीज मटेरियल, या दफनभूमी मध्ये टाकत आहे. त्यामुळे मोरवाडी ग्रामस्थांच्या भावना दुखवत आहेत. महानगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष, नगरसेवक आमदार, खासदार, तिकडे लक्ष नाही. हिंदूंच्या अमरधाम मध्ये हिंदू कॉन्ट्रॅक्टर का नाही? आज पर्यंत कोणत्याही नगरसेवकाने किंवा आमदाराने हा प्रश्न विचारला का नाही? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी आज पर्यंत याबाबतीत प्रश्न उचलला आहे. परंतु त्यांचा आवाज दाबून देण्यात आला. आणि महानगरपालिकेचा लाडका कॉन्ट्रॅक्टर मणियार यालाच कित्येक वर्षापासून महानगरपालिकेचे अमरधाम येथील कॉन्ट्रॅक्ट देण्यात येत आहे. हिंदू समाजात एकही कॉन्ट्रॅक्टर उरला नाही का? जो हिंदू अमरधाम येथे व्यवस्थापन पाहू शकेल? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आणि मारवाडी गावचे ग्रामस्थ यांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसे पक्षाच्या वतीने मोरवाडी दफनभूमीची डागडूजी करण्यासाठी विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देऊन काम करण्यासाठी सांगितले होते. परंतु अमरधाम सांभाळणारा कंत्राटदार मनियार हा कोणाचीही जुमानत नाही. त्याने त्याच्याकडे असलेले मोठमोठाले उंडके आणि लाकडं, तसेच अंतयात्रेसोबत आलेले मृतांचे कपडे,गाद्या, जे घंटागाडी मध्ये टाकले पाहिजेत ते सर्व साहित्य, हा मणियार दफनभूमीमध्ये फेकून देत असतो, इकडे भर टाकून जमीन समान करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून केला असता, गोधड्या ब्लॅंकेट कपडे असे साहित्य बाहेर पडले होते. या ठेकेदाराने आपल्याला नको असे साहित्य, जसे बंद पडलेल्या ट्रॅक्टर वर्षानुवर्षापासून पडलेले झाडाचे मोठे उंडके, मोरवाडी ग्रामस्थांच्या दफनभूमीतच ठेवलेले आहे. त्याला कोणतेही अधिकाऱ्यांची भीती नाही, किंवा कोणत्याही कारवाईची भीती नाही. मोरवाडी ग्रामस्थांच्या भावनांशी चाललेला हा खेळ अजून किती वर्ष चालणार? असे खूप सारे प्रश्न नागरिकांमध्ये पडलेले आहेत. नाशिक महानगरपालिका आयुक्त पुलगुंडवार यांनी याबाबतीत लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे. आणि यासंदर्भात होणाऱ्या कोणत्याही नुकसानाला प्रशासन जबाबदार राहील असेही नागरिकांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...