*पवन नगर स्टेडियम येथे, सुलभ शौचालय बनले, मद्यपींचा अड्डा*


 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड ): पवन नगर स्टेडियम येथे, सुलभ शौचालय बनले, मद्यपींचा अड्डा. नवीन नासिक पवन नगर येथे असणाऱ्या स्टेडियम लगत एक महानगरपालिकेचे सुलभ शौचालय आहे, त्या शौचालयाच्या वरती एक रूप बांधलेला आहे. त्या रूमचा अतिशय गैरवापर होताना दिसत आहे. त्या रूममध्ये टवाळखोरांनी दारूचा अड्डा बनवून ठेवलेला आहे. रूम मध्ये एक सोफा आहे, त्याचा वापर काही हिंडते फिरते कपल्स करतात असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. आणि त्यांनी या टवाळखोरांना जर टोकले तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. स्वच्छतागृह सांभाळत असलेला व्यक्ती *प्रेम शंकर तिवारी* यांनी याबाबतीत माहिती दिली. त्याचबरोबर याच स्टेडियम मध्ये, पवन नगरच्या आसपास राहणारे नागरिक, महिला वृद्ध व्यायामासाठी येत असतात. त्यात टवाळखोरांचा त्यांना खूप त्रास होत असतो. त्यातल्या त्यात खेळण्यासाठी बनवलेल्या ग्राउंड मध्ये, काही बहाद्दर आपल्या चायनीज च्या गाड्या, आणि आपली वाहने देखील पार्किंग करताना दिसतात.प्रशासनाने त्वरित याबाबतीत दखल घेऊन, या स्वच्छतागृहावरील रूम सील बंद करावा. त्या रूमवर जाण्यासाठी लोखंडी शिडी, त्वरित काढून घ्यावी. आणि या टवाळखुरांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...