*महाराष्ट्र शासनाच्या रुग्णवाहिकेने घेतला पेट*


  • मुख्य संपादक( जनार्दन गायकवाड ): मुंबई आग्रा महामार्गावर ओझर (मिग) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या पुढे, समता नगर येथे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका महाराष्ट्र शासनाच्या रुग्णवाहिकेने वाहन क्रमांक MH14-CL-0814 अचानक पेट घेतला. वाहन चालकाच्या सदर बाब लक्षात येताच, वाहन रस्त्याच्या बाजूला उभा करून, अग्निरोधक सिलेंडर च्या साह्याने इंजन मधून येणारी आग विझवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी समता नगर मधील नागरिकांनी पाणी टाकून , आग आटोक्यात आणली. रुग्णवाहिकाही वनी गाव येथून पिंपळगाव मार्गे नाशिकला जिल्हा रुग्णालयात तीन पेशंट अजून चार नातेवाईक, शासकीय दोन महिला डॉक्टर्स असे एकूण नऊ लोक यावेळी या रुग्णवाहिकेत होते.मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र रुग्णांची परिस्थिती खरोखर खूप गंभीर होती. त्यांना नासिक येथे हलवण्यासाठी दुसऱ्या रुग्णवाहिकेसाठी डॉक्टरांनी फोन केला. मात्र एक तास उलटून गेला तरी दुसरी रुग्णवाहिका सदर ठिकाणी आली नव्हती. काही रुग्णांना खूप त्रास होत असल्यामुळे त्यांनी रस्त्यावर अंग टाकून दिले होते. नशिबाने या रुग्णवाहिकेत कोणी ऑक्सिजनवर असलेला पेशंट नव्हता,अन्यथा पेशंटला वाचवणे अशक्य झाले असते. याबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होतात. १)रुग्णवाहिका जर वनी वरून नाशिकला येत होती तर ती दिंडोरी मार्गे डायरेक्ट नाशिकला यायला हवी होती.२) मग ती वनी पिंपळगाव मार्गे नाशिकला का चालली होती. वाहन चालकाला या संबंधात पत्रकार जनार्दन गायकवाड यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की वनी दिंडोरी रोड अतिशय खराब आहे. त्या रस्त्याने रुग्णांना जर घेऊन गेले तर त्यांना अजून त्रास होऊ शकतो. गाडीमध्ये बिघाड होऊ शकतो.त्यामुळे आम्ही गाडी वनी पिंपळगाव ओझर मार्गे नाशिकला घेऊन जात होतो. झालेल्या प्रकारामुळे अजून एक बाब समोर येत आहे की, राज्य महामार्गाच्या कामांकडे ही प्रशासनाचे लक्ष नाही. खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात त्यात जाणारे जीव हे सर्व सामान्य नागरिकांचे, याला जबाबदार कोण? प्रशासनात बसलेले भ्रष्ट अधिकारी अजून किती लोकांचे रक्त पिणार किती?लोकांचे जीव घेणार? असा प्रश्न?आज नागरिकांसमोर पडलेला आहे.
 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...