मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड ): नवीन नाशिक, महानगरपालिकेच्या हद्दीमधील उत्तम नगर मच्छी मार्केट येथे, अतिशय केळसपणे परिस्थिती निर्माण झालेली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष. मार्केटच्या मागच्या बाजूस, सगळीकडे मासे वाहून नेण्यासाठी थर्माकोलचे जे बॉक्स असतात अस्त व्यस्त फेकून दिलेले आहेत. तेथील व्यावसायिकांना विचारले असता घंटा गाडीवाले आमचे हे थर्माकोलची घाण कचरा घेऊन जात नाही, शेवटी खूप साचल्यानंतर आम्हाला तो पेटवून द्यावा लागतो. अशा प्रकारची माहिती दिली. मात्र हा थर्माकोलचा कचरा पेटवून दिल्यानंतर वातावरणात किती प्रदूषिन पसरत असेल याची कल्पना करणे ही अतिशय भयंकर आहे. महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी संजय गांगुर्डे यांनी याबाबतीत लक्ष घालून त्वरित या परिसरातील स्वच्छता करून घ्यावी, आणि जे कर्मचारी या परिसरात स्वच्छता करत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी. असाच दुसरा प्रश्न? पवन नगर स्टेडियम च्या बाजूला असलेला स्वच्छतागृहाचा आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या स्टेडियम लगत असलेल्या स्वच्छतागृहाच्या वरच्या बाजूला असलेल्या रूममध्ये टवाळखोरांनी दारू पिणे, गांजा पिणे, असा अड्डाच करून ठेवलेला आहे. या ग्राउंड मध्ये दिवसा आणि संध्याकाळी महिला वर्ग व वयस्कर व्यक्ती व्यायामासाठी येतात, त्या लोकांनाही आठवण करून चा खूप त्रास होतो. यासंदर्भात तीन दिवस आधी रिपब्लिकन वार्ता न्यूज चैनल च्या माध्यमातून बातमीही प्रसारित केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना ही बातमी पोचल्यानंतरही काहीही फरक पडलेला दिसत नाही. कारण याबाबतीत अजून त्या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नाही. नागरिकांच्या मागणीनुसार त्या स्वच्छतागृहावरील रूम सीलबंद केला पाहिजे व तिकडे जाण्यासाठी जो लोखंडी जिना आहे तो काढून घेतला पाहिजे जेणेकरून तिकडे वरती कोणी जाणार नाही. कारण या टवाळखोरांना जर कोणी टोकले तर ते नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देतात. याच महानगरपालिकेच्या स्वच्छतागृहात काम करणाऱ्या व्यक्तीने याबद्दल माहिती दिली होती. परंतु आज पर्यंत अंबड पोलिसांनी तिकडे कोणतीही कारवाई केलेली नाही. की महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील कोणतीही कारवाई झालेली नाही. या गोष्टींवर आळा बसला नाही तर, सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनावरून विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment