अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी आरोपीकडुन १,५०,०००/- रूपये किंमतीचे एकुण २३ मोबाईल केले जप्त

 मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड ):

अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे फिर्यादी मोहम्मद समशाद ओबेद वय-२४ धंदा खा. नोकरी, रा- हरम कलेक्शन जवळ, संजीवनगर, अंबड लिंक रोड, अंबड, नाशिक यांनी तक्रार दिली कि, दिनांक २५/ १२ / २०२२ रोजी रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास स्लाईड वेल कंपनीचे समोर अंबड एम आय डी सी अंबड नाशिक येथुन माझे घरी रस्त्याने पायी जात असतांना माझे मोबाईल फोनवर बोलत जात असतांना माझे मागुन एका मोटार सायकलवर दोन इसम माझे जवळ येऊन त्या मोटार सायकलवर मागे बसलेल्या • इसमाने माझे हातातील एम आय ५ कंपनीचा मोबाईल फोन बळजबरीने ओढुन घेउन मो.सा. जोरात चालवुन एक्स्लो पॉईन्टकडे जाणा-या रोडने पळुन गेले. म्हणुन माझी त्या मोटारसायकल वरील दोन अनोळखी इसमांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिल्याने अंबड पोलीस ठाणेस गुरनं. ०३ / २०२३ भादविक ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदर मोबाईल चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत पोशि २६९७ प्रविण राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाचे सपोनि / गणेश शिंदे, पोना १८४८ किरण गायकवाड, पोशि २०८३ योगेश शिरसाठ, पोशि १३१३ मुकेश गांगुर्डे, पोशि २०५४ सचिन करंजे, पोशि १८९० तुषार देसले, पोशि २०५९ जनार्दन ढाकणे, पोशि २३९१ संदीप भुरे, पोशि ९३० राकेश राउत, पोशि १४५५ मोतीराम वाघ, पोशि/ २८०४ किरण सोनवणे, पोशि/ २२२९ घनशाम भोये यांनी मिळून सापळा रचुन मोबाईल चोरीचे गुन्हयांतील आरोपी नामे अजय संजय डगळे, वय-२४, रा- सरपंच ढाबाचे जवळ, पिंपळद, ता. जि. नाशिक येथे त्यास ताब्यात घेवुन त्याची सखोल चौकशी करून त्याचेकडुन अंबड पोलीस ठाणेकडील | गुरनं. १०३ / २०२३ मधील चोरीस गेलेला मोबाईल सह इतर १,५०,००० / रू किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे असे एकुण २३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त श्री चंद्रकांत खांडवी, परिमंडळ-०२, सहा पोलीस आयुक्त सोहेल शेख, अंबड विभाग, तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्री. नंदन बगाडे (प्रशासन), पोलीस निरीक्षक श्रीकांत निबांळकर (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्हयांचा पुढील तपास पोउनि उत्तम सोनवणे व पोशि २२२४ सुर्यवंशी

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...