⚡ ब्रेकिंग News

जुन्याभांडणाची कुरापत काढून ऐकाची निर्घून हत्या


 मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड ):  

 नाशिक शहर - खून, दरोडे, गाड्यांची जाळपोळ, घरफोड्या हे जुनं नाशिक शहराच्या पाचवीलाच पुजलेले आहे. चिंचोळा शिवारातील एक दिवस अगोदरच पित्यानेच आपल्या  मुलीला ओढणीने गळा दाबून जीवे मारण्याची घटना ताजी असतानाच, सातपूर मुळे परिसरात लवकर दुसरा खून झाल्याचे समोर येत आहे.

जुन्या वादातून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. संतापाच्या भरात डोक्यात लोखंडी रॉड आणि काेयत्याने वार केल्याने ३० वर्षीय तरुणाचा  मृत्यू झाला.

   ही घटना सातपूर पोलिस स्टेशन हद्दीत  आसलेल्या मळे  परिसरातील भाडेकरु म्हणून राहणारा व्यक्ती मयत संतोष जयस्वाल, गॅरेज मेकॅनिक वास्तव्यास होता. मागील भांडणाची कुरापत काढून संशयित मुन्ना निषाद, रामकिशन निषाद या दोघा भावांनी मिळून  मंगळवार दिनांक १६/०१/२०२३ रात्री अकरा वाजेच्या सुमारास   लोखंडे हत्याराने मारहाण करून संतोष जयस्वाल यास जीवे ठार मारल्याची  घटना समोर येत आहे. संशयतांचे गोरक्षनाथ रोडलगत लेथ मशीनचे दुकान असून दोघांनी यावेळी पळ काढलेला असून.. याप्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

         दोनही संशयित  फरार असून त्यांना शोधन्याचे मोठे आव्हान मात्र सातपूर पोलिसांच्या समोर उभे आहे. घटनेची माहिती मिळताच 

         सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख. सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस  निरिक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, सह सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन, संशयतांचा शोध घेणे  सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...