नाशिक - प्रतिनिधी: दत्तात्रय राजाराम कडनोर, पोलीस उपनिरीक्षक, मध्यवर्ती गुन्हेशाखा, नाशिक शहर पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणुन दि. ०१/०६/१९९१ साली भरती झाले आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सरकारवाडा, भद्रकाली, विशेष शाखा, मुंबईनाका पोलीस स्टेशन व मध्यवर्ती गुन्हेशाखा येथे नोकरी करीत त्यांनी खुन, चोरी, घरफोडी व दरोडा यासारख्या गंभीर गुन्हयांची उकल करून तपासकामी मदत केली आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना १५ गावठी पिस्तोल हस्तगत केले आहेत. भद्रकाली पोलीस ठाणे येथे ६५ मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या गुन्हयांच्या तपासांपैकी १२ गंभीर गुन्हयांत आरोपीतांना शिक्षा झालेली आहे. पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करीता सन २०१७ मध्ये मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पदक व प्रशंसापत्र देवून सन्मानित केले आहे. पोलीस दलात कामगिरी करतांना अनेक गंभीर गुन्हयांची उकल, एम. पी.डी.ए. व मोक्का सारख्या कारवाया करून चैनस्नॅचिंग, मोटारसायकल चोरी या गुन्हयांत लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. पोलीस दलातील एकुण सेवा ३२ वर्षे ७ महिने पुर्ण केलेले असून त्यांना वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी यांचेकडून उत्कृष्ट कामगिरी बद्दल ३७७ बक्षिसे व ३५ प्रशंसापत्र मिळाले आहेत. या केलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापुर्ण सेवेची केंद्रशासनाने दखल घेवून दि. २६ जानेवारी २०२३ मध्ये मा. राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, नाशिक शहर व प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, नाशिक शहर यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांचे कामगिरीचे कौतुक करून सत्कार केला आहे

إرسال تعليق