मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड ): नवीन नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ, *भुकेल्याला भाकर नाही, आणि ज्याचं पोट भरलेलं आहे त्याच्या तोंडात जबरदस्ती भाकर घालण्याचं काम सध्या नवीन नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होताना दिसत आहे* सिडको मध्ये कित्येक ठिकाणी, जिकडे काँक्रीट रोड होते, त्या ठिकाणी डबल, काँक्रीटवर, काँक्रीट टाकून, रस्ते उंच करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी रस्ते फुटलेले आहेत, खचलेले आहेत,त्या परिसरात मात्र,सार्वजनिक बांधकाम कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार मोरवाडी गाव, खंडेराव चौक, पंडित नगर, या परिसरात होताना दिसतो. गेल्या काही दिवसांपासून पंडित नगर मोरवाडी येथील नागरिकांनी, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोरवाडी गाव तसेच पंडित नगर,तसेच खंडेराव चौक या परिसरात, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे, पेवर ब्लॉक बसवणे, तसेच पावसाळी नाल्यांमध्ये खूप कचरा साचलेला असल्यामुळे, सर्वत्र परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. हे पावसाळी नाले साफ करणे, या नाल्यांवर, जाळ्या बसवणे, जेणेकरून कोणीही या नाल्यांमध्ये घाण कचरा टाकणार नाही. अशा विविध समस्यांसाठी निवेदन दिलेत आंदोलना केलेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे याच्याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. यासंदर्भात जोपर्यंत कुणी आमदार किंवा खासदार आदेश करत नाही, तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम अधिकारी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणार नाही का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आज रोजी सामाजिक कार्यकर्ते गौरव केदार, जितू बनकर, गणेश दराडे, सद्दाम शेख,ज्ञानेश्वर केदार, सागर बेदाडे, बाळा चकोर यांनी नवीन नाशिक महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांना निवेदन दिले. सर्वसामान्यांचे प्रश्न किती दिवसात सुटतात हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment