नाशिक सिन्नर :-
प्रतिनिधी -( विशाल गुंजाळ ) :-
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सिन्नर येथे उत्साहात साजरी.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर गाव, येथे शिवसेना शिंदे( गट ) सिन्नर तालुकाप्रमुख -आदित्य चकणे, सिन्नर शहर प्रमुख- रंगा सोनवणे, तसेच पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे, बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमा पूजन करून मानवंदना दिली
याच पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. त्याचबरोबर, बाळासाहेबांची शिवसेना शिंदे (गट ) खासदार हेमंत गोडसे यांच्या हातून श्रावण अशोक पवार यांना मागासवर्गीयसेल युवा नाशिक शहर प्रमुख पद देण्यात आले होते. नाशिक शहराचे नवनिर्वाचित मागासवर्गीयसेल युवा नाशिकशहर प्रमुख श्रावण अशोक पवार यांचा या कार्यक्रमादरम्यान सिन्नर तालुकाप्रमुख- आदित्य चकने यांनी सत्कार करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आपण नव्यानेच राजकारणात आलेले असलो तरीही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असताना मागासवर्गीय समाजाचे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत, आणि यापुढे आपण प्रशासनासमोर मागासवर्गीयांच्या प्रश्नावर पक्षाच्यावतीने आवाज उठवणार. आणि त्यांना न्याय मिळवून देणार, असे आश्वासन समाज बांधवांना श्रावण पवार यांनी यावेळी दिले.

Post a Comment