बाळासाहेबांचे शिवसेना ( शिंदे गट) मागासवर्गीय सेल, युवा नाशिक शहर प्रमुख पदी श्रावण पवार यांची निवड


 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड ):  खासदार हेमंत आप्पा गोडसे, यांच्या हस्ते नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे. शहीद भगतसिंगनगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्रावण पवार यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मागासवर्गीय सेल युवा नाशिक शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे . गेल्या काही दिवसांपूर्वीच श्रावण अशोक पवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. सामाजिक क्षेत्रात केलेल्या त्यांच्या कामाची दखल घेऊन, श्रवण पवार यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे यावेळी पत्रकारांना सांगण्यात आले. प्रसंगी प्रमुख उपस्थिती  मागासवर्गीय सेल जिल्हाप्रमुख दत्ता बाबा ससाने. जिल्हाप्रमुख अनिल ढिकले.नाशिक महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, युवा सेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले, संपर्कप्रमुख संजय बच्छाव सहसंदीप निरभवणे, सचिन पवार, दीपक ठोंबरे, दशरथ पवार, कैलास गुळवे, जगदीश बांगरे, निलेश वाकळे, विक्रम गायकवाड, सागर शिंदे, विशाल सोनवणे, राहुल पवार, जनार्दन ढाले.अविनाश गायकवाड,गणेश शिंदे, राहुल गुळवे, बाळा फसाटे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...