मुख्य संपादक संचालक -( जनार्दन गायकवाड ) नाशिक- नाशिक, विल्होळी गाव, तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, आज सकाळी हॉटेल, हॉलिडे कॉटेज च्या समोर रस्त्याच्या पलीकडे चारीमध्ये, एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, विल्होळी ग्रामीण पोलिसांना मिळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताची ओळख पटलेली असून. नाव: राजेश पांडुरंग जोशी, वय 52 वर्ष, राहणार राजीव नगर, इंदिरानगर नवीन नाशिक. सदर व्यक्ती पेशाने वकील असून आपल्या, वयोवृद्ध आईसोबत राहत होते. सदर घटनेच्या ठिकाणी या व्यक्तीचे कोणतेही वाहन पोलिसांना मिळून आले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. बिना वाहन ही व्यक्ती आपल्या घरापासून इतकी लांब कशी गेली..? कुणाबरोबर गेली? हा अपघात आहे की खून? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत? या घटनेबाबत विल्होळी गावचे पोलीस पाटील यांनी पोलिसांना कळविले असता. तात्काळ विल्होळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन, पंचनामा करून मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवून दिला. प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करून, पुढील तपास विल्होळी पोलिस चौकी हवालदार बच्छाव करीत आहेत.

Post a Comment