हिंदूहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नासिक रोड येथे उत्साहात साजरी
Maharashtra Maza news0
नाशिक रोड प्रतिनिधी-( विशाल गुंजाळ ) : *हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथे अभिवादन सोहळा...* बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाच्या छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ नाशिक रोड, संस्थापक अध्यक्ष शिवाजी राजे भोर अध्यक्ष महेश जाधव, कार्याध्यक्ष ओंकार चव्हाण तसेच सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमा पूजन खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या हातून झाले. यानिमित्ताने मंडळाच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती.खासदार हेमंत आप्पा गोडसे, अजय बोरस्ते राजू लवटे ॲड. विजय कातोरे, ओमकार चव्हाण, वैशाली दाणी, हरीश भडांगे,सह बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे अनेक महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अजय बोरस्ते यांनी बाळासाहेबांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच मंडळाचे कार्याध्यक्ष ओंकार चव्हाण यांनीही आपली प्रतिक्रिया देत जशी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली त्याचप्रमाणे, पुढे येणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती देखील असेच उत्साहात साजरी केली जाईल असे आश्वासन देत सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले. सर्व उपक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मंडळातील अध्यक्ष महेश जाधव, कार्याध्यक्ष ओंकार चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत पडोळ, सरचिटणीस अनिकेत भोर, विभाग प्रमुख मंगेश हगवणे, प्रतीक कदम, भूषण धोंगडे, रवी लोखंडे, सुमित पठारे, निखिल अल्हाट, संदीप यादव, ललित सिंग यादव, स्वप्निल गोसावी तुषार मोरे तेजस रुपवते पिऊ साळवे अथर्व पगारे तुषार खरात समाधान बोराडे हर्षल आढाव अनुराग शिंदे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment