नासिकरोड प्रतिनिधी : (विशाल गुंजाळ) - अवैध रित्या शस्त्र बाळगणा-या इसमांकडुन देशी बनावटीचे पिस्टल, मॅग्झीन, जिवंत काडतुसांसह हस्तगत केलेबाबत खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो यांचे संकल्पनेतुन निर्माण करण्यात आलेल्या खंडणी विरोधी विशेष पथकाला नाशिक शहर आयुक्तालय हददीत खंडणी मागणा-या इसमांवर तसेच शस्त्र बाळगणा-या इसमांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर अंतर्गत असलेल्या, नाशिक रोड पोलीस ठाणे, कडील गुरनं. २४ / २०२३ भादवि कलम ३८७, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे खंडणीच्या गुन्हयांचा समांतर तपास खंडणी विरोधी पथक करत असतांना सदर पथकातील पोलीस अंमलदार २३९२ / स्वप्नील बाळासाहेब जुंद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, वसंत विहार, साईबाबा मंदिरा जवळ, जेलरोड, नाशिक रोड, नाशिक येथे एक इसम शस्त्र बाळगुन आहे. सदर गोपनिय माहितीवरून खंडणी विरोधी पथकातील सपोनि / सुर्यवंशी व अंमलदार यांनी समर्थ अपार्टमेंटचे समोरील रोडवर, वसंत विहार, साईबाबा मंदिरा जवळ, जेलरोड, नाशिक रोड, नाशिक येथुन इसम नामे सोहिल अमजद पठाण वय १९ वर्षे रा- पवारवाडी, सुभाष रोड, नुरीया सुन्नी मजित समोर, नाशिक रोड नाशिक यास ताब्यात घेवुन, त्याचेकडे विचारपुस करता, त्याचे ताब्यात ३०,५००/- रूपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल, मॅग्झीण व जिवंत काडतुसांसह मिळुन आले.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री प्रशांत बच्छाव, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. वसंत मोरे, व पोनि. श्री. विजय ढमाळ यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि / पी. बी. सुर्यवंशी, सपोनि / एच. के. नागरे, श्रेपोउनि / डी. सी भोई, सपोउनि / डी आर सगळे, पो. हवा./ १०६ के जी रोकडे, पो.हवा. / ७२२ आर एस भदाणे, पोहवा १५१६ एस. जे. सोनवणे, पो.ना / ९११ डी. डी. चकोर, पोना ५६१ / वाय. ए. चव्हाण, पोअं २३९२ एस. बी. जुंद्रे, पोअं २५०९ सी. व्ही निकम, पो. अं./ २३८९ बी. ए. जाधव, पो.अ./ ६६३ एम पी जगझाप, पोअं ८६९ ए. एस. येवले यांनी कामगिरी केलेली आहे.

Post a Comment