मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड ): नवीन नाशिक अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत, काळ्या रंगाच्या गाडीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी, दुपारच्या वेळी रस्त्यावर चालत असताना, वेगवेगळ्या तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची घटना समोर येत आहे . सविस्तर वृत्त असे की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ पल्लवी आकाश उकार्डे वय वर्ष २४ गृहिणी, रा. रो हाऊस नंबर १७ पार्थ पॅलेस सिंबोसिस कॉलेज समोर उपेंद्र नगर सिडको नाशिक, आपल्या राहत्या घराकडून लेडीज टेलर कडे जात असताना. दुपारी ०१:३० वाजता काळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्र वजन १७ ग्रॅम ओरबाडून नेले. तसेच सौ. गयाबाई भीमराव बागुल. रा. भाग्योदय कॉलनी उपेंद्र नगर सिडको नाशिक. रा. भाग्योदय कॉलनी उपेंद्र नगर सिडको नाशिक यांची देखील सोन्याची पोत, व सौ वैशाली प्रमोद घरटे. राहणार पांगरे मळा सिडको नाशिक यांची देखील सोन्याचे मनी असलेली पोत, अशाच मोटरसायकल वरून आलेल्या दोन संशयतांनी दुपारी ०१:३० च्या सुमारास शिवपुरी चौक उत्तम नगर येथून त्यांच्या गळ्यातून ओरबाडून नेलेली आहे. तीनही गुन्ह्यांमधील संशयित आरोपी एकच असल्याचा पोलिसांचा कयास आहे. सदर घटनेचा गुन्हा अंबड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून, पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

Post a Comment