अनैतिक देहव्यापार चालवणाऱ्या दलालास अंबड पोलिसांनी केले जेरबंद


मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड)  :                               नवीन नासिक - दिनांक १३/०१/२०२३ अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम धनंजय मधुकर मोरे हा धनलक्ष्मी रो हाऊस बुरकुले हॉल च्या पाठीमागे, काही महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार करून घेत आहे. यावरून पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर व त्यांच्या स्टाफ ने सदर ठिकाणी छापा टाकला असता दोन महिला मिळून आल्या तसेच अनैतिक व्यवसाय चालवणारा इसम धनंजय मोरे.

वय ३० राहणार धनंलक्ष्मी रोहाऊस, क्र.२. बुरकुले हालचा पाठीमागे हा देखील मिळून आला आहे. त्याच्याविरुद्ध गु.र.नं. ३३/२०२३ कलम ३,४,५,७ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर करीत आहेत.सदरची कारवाई ही मा. नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपयुक्त मा. चंद्रकांत खांडवी, परिमंडळ २, सहाय्यक पोलीस आयुक्त,मा.सोहेल शेख, अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे, सहाय्यक उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे, पोलीस शिपाई भोसले यांनी पार पाडली
.

 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...