देवा वाघमारे यांच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन, ज्येष्ठ नागरिकांच्या हातून


 मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड ):

 नवीन नासिक मराठी नववर्षाची सुरुवात मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे यांनी आपल्या २०२३ दिनदर्शिकेचे प्रकाशन , डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम महाकाली मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हातून केले. गेल्या दोन वर्षांपासून, याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक एकंदर  ३०ते ४० महिला व पुरुष, रोज सकाळी दहा वाजता भातुकलीचा खेळ खेळतात. असं म्हणायला हरकत नाही, कारण की रोज सकाळी दहा वाजता न चुकता नाश्त्यासाठी एकत्र येतात.विशेष म्हणजे या ठिकाणी जमणारे  हे ज्येष्ठ नागरिक कुणाकडेही यासाठी पैसे किंवा मदत मागत नाहीत. आणि तिकडे येणारे कोणतेही जेष्ठ नागरिकांकडून देखील कोणत्याही प्रकारचे पैशाची मागणी करत नाहीत.परंतु त्यांचा हा उपक्रम बघून. स्वतः काही रोज त्यांना नाश्त्यासाठी पैसे, किंवा नाश्ता तयार करून आणून देतात, आणि हे सर्व ज्येष्ठ नागरिक  याचा आनंदाने उपभोग घेतात. देवा वाघमारे हे देखील दर गुरुवारी या सर्व लोकांना नाश्त्याची व्यवस्था करून देतात. आणि ते सुद्धा स्वतःच्या हाताने बनवू देऊन. याच ज्येष्ठांचा आदर्श घेऊन देवा वाघमारे यांनी आपल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ नागरिकांच्या हातून संपन्न केला. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, शिवाजी अहिरे, दीपक भामरे, लक्ष्मण पाटील, नवल भामरे, दादाजी अहिरे,राजेंद्र येवला, माधवराव शिरसागर,शिवाजी जगताप, आधार पाटील, शालिमार पाटील, शिवाजी शेवाळे, अशोक सुरासे, वसंत क्षत्रिय, वाल्मीक गवांदे, रामभाऊ पाटील,नामदेव वनवे, शिवाजी चव्हाण, परबबाई साळुंखे, विलाबाई बडगुजर, मनकाबाई पाटील, मल्हारी पाटील, माणिक चव्हाण, शालिग्राम सूर्यवंशी, सह अनेक नागरिक उपस्थित होते 
 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...