भावानेच केला भावाचा घात,


    • मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड ):                         नाशिक शहर  
    • मखमलाबाद शिवारातील गंगापूर रोड कॅनॉल मध्ये दुचाकीसह पडून युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करीत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या अपघाताबाबत नातलगांनी पहिल्यापासून घातपात असल्याचा आरोप केल्याने पोलिसांनी तपास केला असता शेतजमिनीच्या वादातून सावत्र आईला मदत केली म्हणून सख्या लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची हत्या करीत अपघाताचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. यातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    • याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर साहेबराव कराड ४० रा.गंगापूर कॅनॉल जवळ, सरकारी नर्सरी समोर कराड मळा, मखमलाबाद गाव हे कुटुंबा समवेत राहतात. गुरुवार (१२) रोजी आई लंकाबाई साहेबराव कराड यांनी लहान मुलगा दिपक यास फोन करून सांगितले की, रात्री ज्ञानेश्वर घरी पोहचलो नाही.


    • त्यानंतर दिपक हा मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने सकाळी सात वाजेच्या सुमारास शोध घेत असता, ज्ञानेश्वर हा दुचाकी सह गायकवाड मळ्यासमोरील पाटात पडलेला आढळून आला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन मयत झाल्याचे दिसून आल्याने ही खबर म्हसरूळ पोलिसांना दिली असता म्हसरूळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

    • मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातलगांनी व्यक्त केल्याने पोलिसानी त्या दिशेने तपास सुरू केला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता मयत ज्ञानेश्वर कराड यांचे वडील साहेबराव यांचे दोन लग्न झाले असून त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी तर दुसऱ्या पत्नीपासून ज्ञानेश्वर आणि दीपक असे दोन मुले झाले होते.


 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...